
सरस्वती मंदिर ट्रस्ट

क्रीडा संकुल
स्थापना १ जून १९९८
संस्थेच्या संस्थापक विश्वस्त विमलाताई कर्वे यांनी शाळेच्या स्थापनेपासूनच भव्य क्रीडा संकुलाचे स्वप्न पाहिले होते. अनेक अडचणींवर मात करत सरस्वती मंदिर ट्रस्टने हे स्वप्न यशस्वीपणे साकार केले. जून १९९८ मध्ये स्वतंत्र, भव्य आणि आधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी करून या स्वप्नाला वास्तवाचे रूप देण्यात आले.
हे संकुल केवळ क्रीडापुरते मर्यादित न ठेवता त्याला क्रीडा – विज्ञान – सांस्कृतिक केंद्र असे व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूप देण्यात आले आहे. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले असून अनेकांना प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
मुलामुलींसाठी दरवर्षी दोन सत्रांमध्ये—जून आणि नोव्हेंबर—प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. गेल्या २७ वर्षांत या केंद्राने असंख्य गुणवंत खेळाडू घडवले असून, यावर्षी नवीन शालेय इमारतीत हे संकुल अधिक जोमाने आणि अत्याधुनिक सुविधांसह सुरू होत आहे.
आज या संकुलात जिम्नॅस्टिक, रिदमिक जिम्नॅस्टिक्स, बास्केटबॉल, टेबल टेनिस, ज्युदो, तायक्वांडो, व्हॉलीबॉल, मैदानी खेळ आणि कॅरम अशा विविध क्रीडा प्रकारांचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय, सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी दररोज सकाळी योग साधनेचे वर्गही आयोजित केले जातात.

क्रीडा संकुल प्रवेश माहिती
पहिले सत्र -
सोमवार दि. १५ जून ते शनिवार दि. ७ नोव्हेंबर २०२६
अधिक माहितीसाठी
प्रवेश अर्जाची लिंक: https://forms.gle/yaSSUjaA2GkWeTsK7
विशेष मानदंड
-
स्थापना – 1952 : सरस्वती मंदिर ट्रस्टद्वारे प्राथमिक शाळेची स्थापना.
-
संस्थापिका : कै. विमलाताई कर्वे, कै. चि. श्री. कर्वे आणि कै. ग. ना. गाजरे यांच्या प्रयत्नातून शाळेची सुरुवात.
-
परंपरेचा वारसा : संस्थापिका विमलाताई कर्वेंच्या आदर्शांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण.
-
2018 – विशेष गौरव : पद्मभूषण ताराबाई Vlog विशेष संस्था पुरस्कार (पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तर).