
सरस्वती मंदिर ट्रस्ट

२०२५ - २०२६ मधील कार्यक्रम
शैक्षणिक वर्ष २०२५ –२६ हे सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेसाठी उपक्रमांनी समृद्ध ठरले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतलेल्या वार्षिक gathering मध्ये नृत्य, नाट्य, संगीत आणि सादरीकरणांनी सर्वांची मने जिंकली. क्रीडा महोत्सवात धावणे, व्हॉलीबॉल , कबड्डी, बास्केटबॉल यांसारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळभावना दाखवली. सांस्कृतिक उपक्रमांतून भारतीय परंपरा, सण आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संगम घडवण्यात आला. या सर्व कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि टीमवर्कची अधिक वाढ झाली. वर्षभर चाललेल्या उपक्रमांनी शाळेचे वातावरण उत्साही, सृजनशील आणि प्रेरणादायी बनवले.

कै. श्रीमती विमलाताई कर्वे स्मृतिव्याख्यान माला
“विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये भावनिक नाते संबंध यांचा स्नेहपूर्ण समन्वय असणे ही काळाची गरज आहे” – डॉ. आनंद नाडकर्णी सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संस्थापिका आदरणीय कै. विमलाताई कर्वे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी कै. श्रीमती विमलाताई कर्वे स्मृतीव्याख्यान आयोजित करण्यात येते. यंदाचे हे अकरावे वर्ष होते.कै .श्रीमती विमलाताई कर्वे यांनी दि. ६ जून १९५२ रोजी प्राथमिक शाळा सुरू केली. दि. ६ जून २०२६ ते दि. ६ जून २०२७ हे शाळेचे ‘ अमृत महोत्सवी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभाची मुहूर्तमेढ कै .श्रीमती विमलाताई कर्वे यांच्या स्मृतिदिन समारंभाचे औचित्य साधून रोवली गेली. या कार्यक्रमात प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांची ‘प्रकट मुलाखत,शाळेची माजी विद्यार्थिनी सौ. हर्षदा बोरकर यांनी डॉक्टरांची मुलाखत घेतली.

अमृत महोत्सवी वर्ष
सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा कै. विमलाताई कर्वे यांनी दि . ६ जून १९५२ रोजी सुरु केली. आपल्या या शाळेला २०२७ मधे पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत.
यासाठी दि. ६ जून २०२६ ते दि. ६ जून २०२७ या दरम्यान अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे सरस्वती मंदिर ट्रस्टच्या माननीय विश्वस्त मंडळाने ठरविले आहे.