
सरस्वती मंदिर ट्रस्ट

प्राथमिक विभाग
स्था पना ६ जून १९५२
सन १९५२ पासून एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन विद्यार्थी विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सरस्वती मंदिर प्राथमिक शाळेत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतीयुक्त, ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा व आता नवीन धोरणानुसार खेळपद्धती व कौशल्य विकास आधारित पद्धतीचा उपयोग करून औपचारिक अनौपचारिक पद्धतीने मुलांचे अनुभवविश्व समृद्ध करण्याच्या, त्यांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक क्षमतांचा विकास उपक्रम, खेळ,कला शिक्षण यातून साधला जातो. अधिक जाणून घ्या
.jpg)

मुख्याध्यापिका
सौ. अपर्णा सावर्डेकर
D.Ed., MA, DSM
* दि. १२ जून १९९६ पासून शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत .
* दि. १ जुलै २०१९ पासून मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत
* वर्ग अध्यापक म्हणून २३ वर्ष अनुभव
* विद्यार्थी - शिक्षक लोकनृत्य दिग्दर्शन
* विशेष - विद्यार्थी शालेय दिनदर्शिका निर्मिती संकल्पना
* शाळा पातळीवर विद्यार्थी कोडी पुस्तिका निर्मिती संकल्पना
विशेष मानदंड
-
स्थापना – १९५२ : सरस्वती मंदिर ट्रस्टद्वारे प्राथमिक शाळेची स्थापना.
-
संस्थापिका : कै. विमलाताई कर्वे, कै. चि. श्री. कर्वे आणि कै. ग. ना. गाजरे यांच्या प्रयत्नातून शाळेची सुरुवात.
-
परंपरेचा वारसा : संस्थापिका विमलाताई कर्वेंच्या आदर्शांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण.
-
२०१८ – विशेष गौरव : पद्मभूषण ताराबाई Vlog विशेष संस्था पुरस्कार (पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तर).
-
२०१९ व २०२० – सलग दोन वर्षे पुरस्कारप्राप्त : विंझकिंग संस्था आणि न्यूज 18 लोकमततर्फे ठाणे व नवी मुंबई विभागातील उत्कृष्ट मराठी माध्यम प्राथमिक शाळा पुरस्कार.









