
सरस्वती मंदिर ट्रस्ट

पूर्व प्राथमिक विभाग
२०२५ - २०२६ मधील कार्यक्रम

पौष्टिक खाऊजत्रा
पूर्व प्राथमिक विभाग, ठाणे
पौष्टिक खाऊजत्रा
सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभागात दर वर्षी आमचा डबा हा प्रकल्प राबविला जातो.
शून्य ते आठ वयोगट हा मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्तवाची वर्षे आहेत. या काळात त्यांना पोषक आहार देणे हे गरजेचे असते. सद्यपरिस्थितीमध्ये आपल्याला खाण्यासाठी बाहेरचे पदार्थ सहज उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांचे पौष्टिक मूल्य विचारात न घेता आपण सर्वच जण ते खातो. ही आपली सवय मुलांमध्येही आपसूक रुजवली जाते. परिणामी निःस्तव खाण्याचे प्रमाण वाढीस लागते.
या सगळ्यावर विचार व्हावा, मुलांचा शाळेतील डबा त्याचे प्रमाण यांवर विचार व्हावा यासाठी शाळेत सदर प्रकल्प राबविला जातो.
या प्रकल्पांतर्गत शाळेमध्ये पौष्टिक खाऊ जत्रा भरवली होती. त्यात ६५ पालकांनी सहभाग घेऊन विविध पौष्टिक पदार्थ मुलांसाठी आणले होते. तीन वर्गात बसलेल्या या पालकांकडून मुलं डबे भरभरून खाऊ घेत होती व बसून खात होती.
विविध प्रांताच्या, चवीच्या, गहू, नाचणी अशा मिलेटस् च्या विविध पदार्थांनी वर्ग भरून गेले होते.
पालकांनाही या जत्रेतून वेगवेगळ्या पदार्थांची माहिती व चव मिळाली.
डॅा. मानसी मेहेंदळे यांना या जत्रेसाठी प्रमुख पाहुण्या व परिक्षक म्हणून बोलावले होते. त्यांनी छान परिक्षण करून जत्रेतून तीन पदार्थांची विषेश उल्लेखनीय पदार्थ म्हणून निवड केली.
संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मा. श्री दिघेसरांनी या जत्रेत भेट दिली व पालकांच्या पदार्थांच्या कृतीपुस्तिका तयार करू असे घोषित केले.